पुणे : शहरात गुरुवारी २२६ कोरोनाबाधित आढळून आले असून, १४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४८५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ३८ टक्के इतकी आढळून आली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही २ हजार १२९ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार- शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ७७ हजार २८१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार ७३२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ७८ हजार ७७१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८३२ जणांचा मृत्यू झाला आहे.