पुणे : शहरात गुरुवारी २५७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत शहरात २ हजार ७०३ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८१७ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.४१ टक्के इतकी आहे. तर आज १९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ४३७ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६९९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ९८ हजार ७३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७५ हजार ९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६३ हजार ८८५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
----------------------