लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात गुरुवारी २६१ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ४५७ इतकी आहे. आजमितीला ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही १ हजारच्या आत आली असून, ती गेल्या दोन महिन्यांत प्रथमच ९८३ इतकी झाली आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७५३ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.५३ टक्के इतकी आहे. तर, आज २२ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ५३५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ६१ हजार ३३६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७३ हजार ३०० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ६१ हजार ३९६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ४४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------