‘टिक टिक’ वाजते एसटीत, तिकीट मशीन
दुरुस्तीसाठी एसटीकडे नाही पैसा!
डमी ९७५
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सह सर्व विभागांत ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट इशुउईंग मशीन) बंद अवस्थेत आहेत. पुणे विभागात जवळपास ७५४ मशीन बंद झाल्याने एसटीने पूर्वीसारखे ट्रेचा आधार घेत प्रवाशांना तिकीट देत आहे. ट्रायमॅक्स कंपनीचे बिल थकल्याने तिकीट देणाऱ्या ‘ईटीआय’ मशीनची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे एसटीत आता पुन्हा टिक टिक सुरू झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने आधुनिकतेची कास धरत नवे बदल करण्यास सुरू केली खरी पण त्यात सातत्य ठेवण्यात अपयशी ठरत आहे. कधी इटीआय मशीन बंद पडणे, तर कधी विशिष्ट बटन ऑपरेट न होणे, बॅटरी उतरणे अशा विविध कारणामुळे वाहकांची डोकेदुखी ठरली आहे. आता तर ज्या कंपनीने ही मशीन एसटीला पुरवली आहे. त्याचे बिल देखील एसटीने दिले नाही. त्यामुळे राज्यातील हजारो मशीन नादुरुस्त आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी ने वाहकांकडे ट्रे दिला आहे. त्यातून पुन्हा कागदी तिकीट दिले जात आहे.
बॉक्स १
जिल्ह्यात एकूण एसटी बस :१ हजार
सध्या सुरू असलेले बस : ५८५
एकूण इटीआय मशीन : १९३८
सुरू असलेले मशीन : ११८४
बंद मशीन : ७५४
बॉक्स २
सर्वच आगारात ट्रे चा वापर
पुणे विभागात एकूण १३ आगार आहेत. त्या सर्व विभागात ट्रेचा वापर केला जात आहे. यात स्वारगेट, वाकडेवाडी, दौंड , इंदापूर, आदी आगारांचा समावेश आहे.
बॉक्स 3
दुष्काळात तेरावा :
राज्य परिवहन महामंडळाचे रोजचे उत्पन्न पूर्वी २२ कोटी इतके होते. ते आता ८ कोटी झाले आहे. म्हणजेच रोजचे उत्पन्न जवळपास १४ कोटीने घटले आहे. शिवाय डिझेलचे वाढणारे दर यामुळे एसटी तोट्यात मोठी वाढ होत आहे. पूर्वी पुणे विभागाचे रोजचे उत्पन्न हे १ कोटी वीस ते १ कोटी ३० लाख इतके असायचे. आता मात्र ते ४० ते पन्नास लाखापर्यंत आले आहे. त्यात आता मशीनची झालेली नादुरुस्ती. एसटी ने थकवलेले बिल दिल्याशिवाय या मशीन पुन्हा सुरू होणे अवघड आहे.
बॉक्स ४
वाहकांची पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव :
मशीन बंद झाल्याने वाहकांना अडचणीना तोंड दयावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तिकीट देताना वाहकांना नीट पाहून तिकीट द्यावे लागत आहे. शिवाय हिशोब करताना आकडे चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना सतत हिशोब करावे लागत आहे.
कोट १ :
आपल्याकडे काही मशिन बंद आहेत. मात्र त्या अतिरिक्त प्रमाणात आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम झालेला नाही. प्रवाशांना मशीनच्या माध्यमातूनच तिकीट दिले जात आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग,पुणे.
कोट : २
तांत्रिक बिघाडीमुळे तिकीट मशीन बंद पडताहेत.मात्र त्यासाठी वाहकाना जवाबदार धरले जाते.तसेच झालेल्या नुकसानिसाठी वाहकांच्या पगारातून रक्कम वसुल केले जाते.ही पूर्णतः चुकीची गोष्ट आहे.
संदीप शिंदे, अध्यक्ष,महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना .