हडपसर : हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्स येथे करमणुकीचे कार्यक्रम करण्यास परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात तिकिटविक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिध्द अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी ७०० ते ५ हजार रुपयांपासून हजारो तिकिटे विकण्यात आली. ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्यावर प्रेक्षकांना कळविण्याचे सौजन्यही आयोजकांनी दाखविले नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती. ‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. मात्र, ते कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर ‘तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे’ असा बोर्ड लावण्यात आला होता. कार्यक्रम रद्द झाल्याचा मोबाईलवरील संदेशही कार्यक्रम सुरू होण्याअगोदर १० मिनिटे आला. त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड मनस्ताप झाला. या कार्यक्रमाचे आॅनलाईन बुकींग गेल्या २० दिवसांपासून आॅनलाईन सुरु होते. ७०० रुपये ते ८००० पर्यंत तिकीट होते. सुमारे १५०० चाहत्यांनी तिकीटे बुक केली होती. रहिवाशांच्या विरोधामुळे करमणुकीच्या कार्यक्रमांना बंदी आयोजकांशी सांगितले कि, असे गाण्याचे कार्यक्रम करण्यास मगरपट्टा सिटीतील रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली. लक्ष्मी लॉनवर असे कार्यक्रमास बंदी असल्याचे आम्हाला सांगितले नाही त्यामुळे तिकीट बुकिंग व या कार्यक्रम आयोजन करण्यात आले . याठिकाणी रहिवाशी झोन असल्याने येथील नागरिकांनी कार्यक्रमाबाबत तक्रार करून असे कार्यक्रम येथे होऊन नयेत अशा आदेश शासनाकडून आणला आहे. यामुळे येथे फक्त लग्न,टूनार्मेंट व शाळेचे इव्हेंट होणार आहेत.
सोशल मीडियावर संतापआयोजकांनी कार्यक्रम अचानक रद्द करून आम्हाला कळविलेही नाही. त्यामुळे प्रचंड मनस्ताप झाला. आम्ही प्रवास करून येथपर्यंत पोहोचलो होतो. परंतु, आयोजकांनी सौजन्य दाखविले नाही. कार्यक्रम आजच दुसऱ्या ठिकाणी आयोजित करणे गरजेचे होते. आता पुन्हा पुढची तारीख सांगत असले तरी कधी होणार आणि दिलजीतचे चाहते येणार का हा प्रश्न आहे. - भावना अहुजा