शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध

By admin | Published: June 28, 2017 4:12 AM

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला रविवारी सीझन्स मॉल येथे अनोखी श्रद्धांजली वाहिली.

पुणे : डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला रविवारी सीझन्स मॉल येथे अनोखी श्रद्धांजली वाहिली. लोकमत व इरॉस इंटरनॅशनल यांच्या सहयोगाने अरान्हाज रोजरी ग्रुप आॅफ स्कूल्स अँड कॉलेजेस् प्रस्तुत ‘एमजेला नृत्यांजली म्हणून डान्स विथ टायगर’ हा कार्यक्रम जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘शेक अँड मूव्ह’ डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी नृत्यप्रेमींनी मायकेल जॅक्सन स्टाईलमध्ये नृत्ये सादर केली.‘एमजे फाईव्ह’ या सुप्रसिद्ध नृत्य समूहाने या कार्यक्रमात विशेष उपस्थिती दर्शविली. मायकेल जॅक्सन स्टाईलने नृत्य सादर करून या नृत्य समूहाने उपस्थितांची मने जिंकली. शिवगर्जना या ढोलपथकाने ढोलवादन करून टायगर श्रॉफ व निधी अगरवाल या ‘मुन्ना मायकेल’ चित्रपटातील कलाकारांचे स्वागत केले. टायगर श्रॉफ याने निधी अगरवालसमवेत ‘डिंग डांग’ या गाण्यावर दिलखेचक अदांसह ठेका धरला. पुणेकरांना ‘कसं काय पुणे?’ असा प्रश्न विचारत उपस्थितांना साद घातली. ‘मुन्ना मायकेल’च्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली.लोकमतचे आभारलोकमतने आंतरराष्ट्रीय नृत्यसम्राट मायकेल जॅक्सनला अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर माझा आगामी चित्रपट "मुन्ना मायकेल"चे इतक्या मोठ्या संख्येने पुणेकरांनी उत्साहात स्वागत केले; त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्मी मिळाली आहे. - टायगर श्रॉफ, अभिनेता"मुन्ना मायकेल" चित्रपटातून पदार्पण करतानाच पुणेकरांचे इतके प्रेम मिळाले त्याबद्दल मी इरॉस इंटरनॅशनल व लोकमतची ऋणी आहे. पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्रासोबत मी जोडली गेले आहे, याचा अतिशय आनंद वाटतो. - निधी अगरवाल, अभिनेत्रीआमच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना टायगर श्रॉफने स्वत: भेट दिली व मार्गदर्शन केले त्याबद्दल टायगरला खूप-खूप धन्यवाद आणि त्याच्या "मुन्ना मायकेल"साठी शुभेच्छा. आजच्या पिढीचा आयकॉन असलेल्या टायगर श्रॉफशी भेट आणि त्याच्या नृत्याविष्काराची झलक पाहून पुणेकर भारावले. या कार्यक्रमासोबत जोडलो गेल्याबद्दल मी लोकमतचा आभारी आहे.- विनय अरान्हा, विश्वस्त, रोजरी ग्रुप आॅफ स्कूल्स अँड कॉलेजेस्रविवारच्या संध्याकाळी खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकाची त्याला पाहण्यासाठी चाललेली तगमग, तुफान गर्दी, प्रचंड उत्सुकता, गाण्यांनी संगीताने भारावलेले वातावरण, सोबत दिल्ली व पुणे येथील डान्स गु्रपने सादर केलेल्या अफलातून नृत्याने प्रेक्षक हरखून गेले होते. आता फक्त नजरा होत्या त्या लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिरोपंती फेम टायगर श्रॉफवर.