पुणे : शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा करणारी ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात शनिवारी मध्यरात्री अचानक फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर आल्याने टिळक रस्ता व बाजीराव रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. मध्यरात्रीच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येऊन विस्कळीत झालेला पुरवठा सुरळीत करण्यात आला. पाणीपुरवठा सुरळीतफुटलेल्या जलवाहिनीच्या शेजारी कात्रजहून येणारी जुनी जलवाहिनी असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे येत होते. फुटलेल्या जलवाहिनाचा पाणीपुरवठा बंद करून रविवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सदाशिव पेठ, नारायण पेठ, स्वारगेटचा काही भाग, निलायम टॉकीज परिसर ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दुरुस्तीनंतर या भागाला पाणीपुरवठा झाला.
टिळक रस्त्यावर जलवाहिनी फुटली
By admin | Published: November 09, 2015 2:20 AM