शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ, सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:41 PM

सांडपाण्यामुळे पाणीसाठे प्रदूषित : जलप्रदूषणामुळे महामार्गानजीकचे नागरिक हवालदिल

सासवड : आळंदी ते पंढरपूर (मंगळवेढा) हा रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील काळेवाडी (ता. पुरंदर) येथे मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसायाच्या वाढत्या सांडपाण्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. सोडण्यात येणारे सांडपाणी व स्वच्छतागृहातील पाणी एकत्रित सोडून दिले जात आहे, या पाण्यामुळे ओढे-नाले व विहिरी यांचे पाणीसाठे प्रदूषित होत आहेत.शेतजमिनीही काही काळानंतर नापीक होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. पाणी पिण्यायोग्य व वापरण्यास उपयोगी नसल्याचे दिसून येत आहे. पाळीव जनावरे असे पाणी अनवधानाने पीत असल्याने भविष्यात कोणत्या रोगाला बळी पडतील हे सांगता येत नाही. परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, दुष्काळी परिस्थितीत हा वाढीव खर्च नाइलाजाने करावा लागत आहे.

महामार्गाच्या कडेला असलेल्या नागरिकांनी याबाबत स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र कागदी घोडे नाचविण्यापलीकडे कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. पुरंदरमध्ये यावर्षी दुष्काळाची दाहकता जास्त आहे, यास्थितीत पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होईल हा प्रयत्न केला पाहिजे; मात्र प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे काणाडोळा करण्याचे काम चालविले आहे, परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.सांडपाणी व स्वच्छतागृहातील पाणी एकत्रित करून, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कमी खर्चात करता येणारी मैलापाणी प्रक्रिया सयंत्र उभारणी करण्याची सक्ती हॉटेल व्यावसायिकांना प्रशासनाने केली पाहिजे, हे प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरता येईल. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे, त्यादृष्टीने आहेत ते पाणीसाठे जपण्याचे काम प्रशासकीय व्यवस्थेने गांभीर्याने करावे, अशी मागणी या भागातील शेतकरी व सांडपाणीबाधित विहिरीचे मालक बाळासाहेब सखाराम झेंडे व इको फाउंडेशनचे संचालक तानाजी सातव यांनी केली आहे. 

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे