नीरा :
नीरा (ता.पुरंदर) येथील बुवासाहेब मंदिरा शेजारील भाजी मंडईतील भाजीविक्रेते पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. ग्रामपंचायतीनी वेळेचे बंधन घालून ही कोरोना संसर्गाचे व वेळेची बंधने पायदळी तुडवली जात आहेत. त्यामुळे काल सोमवारी या भाजी मंडईत नीरा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यानंतर ही आज मंगळवारी पुन्हा वेळेची मर्यादा न पाळता हे मगरुर भाजी विक्रेते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने थाटून बसली होते.
नीरा ग्रामपंचायतीने मागील आठवड्यापासून अत्यावश्यक दुकाने सकाळी दहा ते चार यावेळेत सुरु ठेवण्याचे सुचवले होते. नीरा बाजार तळावरील भाजी विक्रेती, शेतीपूरक दुकाने, किराणा व्यावसायिक, मटण, मच्छीविक्रेती वेळेची बंधने पाळतात, मात्र बारामती रोडवरील बुवासाहेब मंदिरा शेजारील भाजी मंडईतील भाजी विक्रेते दुपारी चार नंतरही दुकाने थाटून बसल्याचे दिसल्याने प्रवाशी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
काल सोमवारी नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, संदीप मोकाशी, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी दुपारी चारनंतर या मंडईत धडक कारवाई करत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. ६ भाजी विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे ३ हजारांचा दंड वसूल केला होता. तरीही मंगळवारी पुन्हा या भाजी विक्रेत्यांनी वेळेचे बंधन न पाळता दुपारी चार नंतरही भाजी मंडई सुरू ठेवली होती.
चौकट
नीरा आठवडे बाजार हा बुधवारी असतो. ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजर बंद असले, तरी नीरा येथील बुवासाहेब मंदाराशेजारी भाजी मंडई नियमीत भरवली जात आहे. मागील दोन्ही आठवड्यांत या ठिकाणी बुधवारी मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेते, सुकट, बोंबीलवाले, फळ विक्रेते, बेकरी उत्पादने विक्रेत गर्दी करत आहेत. आज बुधवरी तरी याठिकाणी भाजी मंडई भरते का, हे पाहणे गरजेचे आहे.
--
फोटो क्रमांक : २० नीरा भाजीमंडई सुरू
फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील बुवासाहेब भाजी मंडईत वेळेचे बंधन पायदळी तुडवत भाजी विक्रेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने थाटून बसली होती.