पिंपरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला या निवडणुका २२ एप्रिलला होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. प्रचारासाठी वेळ कमी मिळणार असल्यामुळे इच्छुकांची भंबेरी उडाली होती. पण निवडणुका लांबल्यामुळे त्यांनी नि:श्वास सोडला आहे. मावळ तालुक्यातील १०४ पैकी ५१ ग्रामपंचायतींची मुदत २१ आॅगस्टला संपत आहे. देहूगाव ग्रामपंचायतीची मुदतही त्या दिवशी संपत आहे. या निवडणुका गत पंचवार्षिकला जुलै महिन्यात झाल्या होत्या. यंदाही त्याच महिन्यात निवडणूक कार्यक्रम लागेल, अशा विचारात इच्छुक असतानाच निवडणूक आयोगाकडून अचानकपणे २२ एप्रिलला निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे इच्छुकांची भंबेरी उडाली. मात्र, आमदारांच्या विनंतीमुळे २२ एप्रिलची निवडणूक स्थगित करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरूकेली आहे. विविध कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. जुलै महिन्यात निवडणुका होतील, या अपेक्षेनुसार संबंधितांचे नियोजन सुरू होते. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवायचे, प्रत्यक्ष भेटीगाठी कधी घ्यायच्या याची आखणीही केली. ज्या इच्छुकांकडे जातीचा दाखला उपलब्ध नाही. (प्रतिनिधी)
इच्छुकांच्या ‘लगीनघाई’ला वेळ
By admin | Published: April 01, 2015 4:58 AM