नुकतीच राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. मात्र, या पॅकेजमध्ये या तरुणांचा व नवोदय व्यावसायिकांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शासनाने युवा व्यावसायिकांसाठी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी कुंडाई ग्राफिकचे मालक भरत घोडे यांनी केली आहे
ग्रामीण भागातील बारा बलुतेदारी पद्धत कमी होत चालली असली, तरी या त्या माणसांनी नवीन व्यवसायात पदार्पण करून कुटुंब कबिला पोहोचण्याचे काम करीत आहेत. मात्र, गेले वर्षभर या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने त्यांना मदत करावी तसेच बँकांनी कर्जवसुली थांबवावी अशी मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले आहे.