पुणो : पिंपरी- चिंचवड समस्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून समस्यांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. एक दिवसाच्या पुणो दौ:यावर आलेल्या फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या वेळी फडणवीस यांनी केवळ प्रश्नांची माहिती घेतली, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
या बैठकीत चिंचवडमधील पूररेषेबाबत फेरविचार केला जावा, तसेच मावळ येथे नदीपात्र खोल करावे अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिका:यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या बैठकीत महानगरपालिकेमध्ये 1997 मध्ये ज्या गावांचा समावेश झाला, त्यांचा विकास अद्यापही झाला नाही, तसेच नगर विकास विभागाकडून महानगरपालिकेच्या प्रस्तावांना मंजुरी रखडलेली असल्याची माहिती अधिका:यांसह पदाधिका:यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व समस्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून समस्यांची सोडवणूक केली जाईल, असे स्पष्ट करीत याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल असेही सांगितले.
दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीस पालिका आयुक्त राजीव जाधव यांनी महानगरपालिकेच्या विविध समस्या आणि त्या सोडविण्यासाठी राबवीत असलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. या बैठकीस महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबूकस्वार आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर विभागीय आयुक्त विकास देशमुख, प्रधान सचिव श्रीकांत सिंग, प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नोंदणी महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव उपस्थित होते.(प्रतिनिधी)
4महापालिकेमध्ये 1997 मध्ये ज्या गावांचा समावेश झाला, त्यांचा विकास अद्यापही झाला नाही, तसेच नगर विकास विभागाकडून महानगरपालिकेच्या प्रस्तावांना मंजुरी रखडलेली असल्याची माहिती अधिका:यांसह पदाधिका:यांनी दिली.
4आयुक्त राजीव जाधव यांनी मांडल्या समस्या.