पिंपरी : चिखली परिसरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले. आजुबाजुच्या दुकानांना, गोदामांना आगीची झळ पोहचू नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अग्निशामक दलाच्या आग विझविण्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टायरच्या गोदामांमुळे आगीने अगदी कमी वेळेत रौद्ररुप धारण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांसह खासगी कंपन्यांच्या गाड्यासुध्दा आग विझविण्यासाठी मागविण्यात आल्या आहेत. कुदळवाडी भागात आगीच्या घटना नवीन नाही. परंतु, या घटनांकडे गंभीरपणे बघण्याची गरज रहिवासी व पालिका या दोघांनाही वाटत नाही. कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना याठिकाणी करण्यात येत नाही. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुदळवाडीतील आगीत टायरचे गोदाम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:46 PM
चिखली परिसरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम जळून खाक झाले.
ठळक मुद्देकुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना याठिकाणी नाही.