पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. . शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. कालच्या भाषणात त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती.''आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व आपण घेऊन बसणार आहोत. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत फक्त हिंदू असतो. तो २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीननं आक्रमण केल्यावर त्याला आपण कोण कळतच नाही. मग ज्यावेळी त्याला कळतच नाही तेव्हा तो मराठी, गुजराती, तमिळ असा होतो. मग तो ज्यावेळी तो मराठी होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राह्मण, आग्री असा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे," असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला होता.
महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडूनही राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अजित पवारांनीसुद्धा राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांवर टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पवार म्हणाले, राज ठाकरे नुसती पवार साहेबांवर टीका करतात, एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कौतुक केलं अन् आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत. आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. याचं जन्म नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिल जात. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आमदार आपल्याला सोडून का गेले हे पाहावे
राज ठाकरे यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी १४ आमदार आपले आले होते. ते आपल्याला सोडून का गेले? त्याची विश्वासार्हता राहिली नाही. एकेकाळी नाशिक, पुण्यात अनेक नगरसेवक आमदार होते, त्यांना कितीजण सोडून गेले ते त्यांनी पाहायला हवे.