पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून नव्याने लस न आल्याने, आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेली कोविशिल्ड लस आज (गुरुवार, दि. १६) शहरातील ६० लसीकरण केंद्रांवर वितरित करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी लसीचे १०० डोस दिले जाणार आहेत. दरम्यान, आज कुठेही कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर १५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे, तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२४ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दि स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
--------------------