पुणे : पुणे महापालिकेच्या ५७ लसीकरण केंद्रांवर बुधवारी (दि. २२) प्रत्येकी १२० कोविशिल्ड लसीचे डोस वितरित केले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांत प्रत्येकी ४०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून दिल्या आहेत.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही आॅनलाईन बुकिंगद्वारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (२९ जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) आॅनलाईन बुकिंगव्दारे, तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
-------------------