पुणे : पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी गुरुवार (दि. १६) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जमीन, घर किंवा इतर स्थावर मालमत्तावर कोणत्या प्रकारचे आरक्षण पडले आहे, याची तपासणी करून त्यावर हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
पीएमआरडीएने २ ऑगस्ट राेजी प्रदेश क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. सुरुवातील एक महिन्याची यासाठी मुदत देण्यात आली होती. महिन्याभरात नागरिकांनी तब्बल २६ हजार हरकती, सूचना दाखल केल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनाने यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ४५ दिवसांत ४० हजार हरकती या पीएमआरडीएकडे प्राप्त झाल्या आहेत.
----
या मेल आयडीवर पाठवा हरकती
ज्या नागरिकांना हरकती, सूचना प्रत्यक्ष कार्यालयात येऊन देता येणे शक्य नाही, अशा नागरिकांना pmr.dp.planning@gmail.com या मेल आयडीवर हरकती पाठवण्याची शेवटची संधी आहे.
---
...या विभागीय केंद्रावर नोंदवा हरकती
* औंध येथील पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय
* आकुर्डी येथील पीएमआरडीए कार्यालय
* वाघोली क्षेत्रीय कार्यालय (ग्रामपंचायत कार्यालयामागे)
* नसरापूर क्षेत्रीय कार्यालय (तलाठी कार्यालयाशेजारी)
* वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय (जुनी पंचायत समिती इमारत)
* पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नऊ तहसील कार्यालय