शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 1:33 PM

आज पुण्याकडे प्रस्थान अन् मुक्काम; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर

भानुदास पऱ्हाड

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने बुधवारी (दि.२२) सकाळी लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले.           संपदा सोहळा नावडे मनाला            लागला टकळा पंढरीचा !!१!!           जावे पंढरीशी आवड मनाशी !           कधी एकादशी आषाढीई !!२!!           तुका म्हणे एशे आर्त ज्यांचे मनी !           त्यांचे चक्री पाणी वाट पाहे !!३!!

 अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. मंगळवारी रात्री उशिरा अजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माउलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी सहज व सुलभ दर्शन घेतले. तत्पर्वी मंगळवारी (दि.२१) रात्री आठच्या सुमारास पालखीने मंदिरातून प्रस्थान ठेवले. मानकरी व ग्रामस्थांच्या खांद्यावरील मंदिर प्रदक्षिणा व प्रथेप्रमाणे चक्रांकित महाराजांच्या पूजेनंतर सोहळा पहिल्या मुक्कामी नवीन दर्शनबारी मंडपात (आजोळी) विसावला. 

प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन मंडपात दर्शनासाठी आत घेण्यात येत होती. माउलींच्या दर्शनसाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा वाढत होत्या.                    धन्य आज संत दर्शनाचा !                   अनंत जन्मीचा शिण गेला !!                   मज वाटे त्यांशी अलीगन द्यावे !                   कदा न सोडावे चरण त्यांचे !!

या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा ठेकून स्वता:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माउलींच्या पालखीला नैवद्य दाखविण्यात आला. पावणेसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात आले. त्यानंतर माउलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली.             वाजत - गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावला. थोरल्या पादुका मंदिरात अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठ, तर एकादशी व बारशीला सासवडनगरीत मुक्काम करणार आहे. दरम्यान केंदूर (ता.शिरूर) येथील श्री. संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सकाळी सहाला पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी