शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

साहित्यिकांच्या मांदियाळीत सारस्वतांचा आज सन्मान

By admin | Published: November 22, 2015 3:41 AM

मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत माध्यम

पुणे : मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घालणाऱ्या सारस्वतांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित मोहर ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’चा दिमाखदार सोहळा आज (दि. २२) पुण्यात रंगणार आहे. राज्यभरातील नामवंत, कर्तृत्ववान अशा साहित्यिकांच्या, प्रकाशकांच्या व जाणकार रसिकांच्या उपस्थितीत मान्यवर साहित्यिकांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करून त्यांच्या साहित्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. हा समारंभ हॉटेल हयात रिजेन्सी, नगर रोड येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे व नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहर ग्रुपचे अध्यक्ष व घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रख्यात संगीतकार अजय, अतुल गोगावले यांची विशेष उपस्थिती असणार आहे़ समारंभाचे अध्यक्षस्थान लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा भूषवणार आहेत.लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक, संशोधक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांना ‘लोकमत जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. १ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याखेरीज नऊ साहित्यप्रकारांतील प्रतिभावंत लेखकांचा ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’ने सन्मान होणार आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांमध्ये कथा विभागात सतीश तांबे, कादंबरी विभागात नामदेव माळी, कविता विभागात श्रीधर नांदेडकर, ललित गद्य विभागात अतुल धामनकर, ललितेतर गद्य विभागात एम. डी. रामटेके, चरित्र-आत्मचरित्र विभागात अरविंद जोग, वैचारिक समीक्षा विभागात प्रा. प्रकाश पवार, अनुवाद विभागात धनश्री हळबे, विज्ञान विभागात देशोदेशीचे पाणी व इतर चार पुस्तके लिहिणारे मुकुंद धाराशिवकर यांचा समावेश आहे. प्रत्येक वाङ्मयप्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठासाठी चित्रकार सतीश भावसार यांची निवड करण्यात आली आहे. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील साहित्यिकांची दखल घेऊन त्यांच्यातून चांगल्या साहित्यकृती निवडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची व प्रोत्साहनाची थाप देण्यासाठी लोकमत समूहाने सुरू केलेल्या साहित्य पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. लोकमत साहित्य पुरस्कारांतर्गत गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेल्या राज्यभरातील साहित्यकृती विचारात घेण्यात आल्या होत्या. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. द. ता. भोसले, निरंजन घाटे, अरुणा ढेरे, नीरजा आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)