पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११0 वा पदवी प्रदान समारंभ शुक्रवारी (दि.३0) विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मागील मैदानात आयोजित करण्यात आला असून, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून पदवी प्रमाणपत्र वितरणास सुरुवात होणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार वर्षातून दोन वेळा पदवी प्रदान समारंभ आयोजित केला जाणार आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्यात विद्यापीठाचा मुख्य पदवी प्रदान समारंभ पार पडणार आहे. त्यात केवळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएच.डी.पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केले जाईल.विद्यापीठाच्या आवारात कोणत्या ठिकाणी, कोणत्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण केले जाईल, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठात फलक लावून प्रसिद्ध केली आहे.सकाळी आठ वाजल्यापासून पदव्यांचे वितरण केले जाणार असले तरी ११ वाजता मुख्य कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही काळ वितरणाचे काम बंद ठेवले जाईल. कार्यक्रम संपल्यानंतर वितरणाचे काम पुन्हा सुरू होईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
आज विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ
By admin | Published: December 30, 2016 4:54 AM