शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:47 PM

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठळक मुद्दे१३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. २९ अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून १३ अधिकाºयांची नेमणूक१३ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटात ही निवडणूक होईल, असे चित्र आहे.

बारामती : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांतील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. आज (दि. २९) अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून १३ अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदा प्रथमच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन होत आहे. ऐन दिवाळीत निवडणुकीची धामधूम असणार आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी निकालाचे फटाके फुटणार आहेत.लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरुम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती होण्यासाठी प्रशिक्षण देखील  देण्यात आले आहे.ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशनपत्र भरण्याची सुरुवात  दि. २२ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्याची सुविधा सर्व महा-ई-सेवा केंद्र व संग्राम केंद्र येथे करण्यात आली आहे.  निवडणुकीविषयी माहिती निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. बारामती एमआयडीसीतील रिक्रिएशन हॉलमध्ये १७ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यंदा थेट जनतेमधून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे विजयी सरपंच आणि विजयी ग्रामपंचायत सदस्याचा, असे दोन निकाल जाहीर होणार आहेत. 

सणासुदीला येणार गटबाजीला उधाणऐन दसरा दिवाळी सणाच्या दिवसांमध्ये बारामती तालुक्यात निवडणुका होणाºया गावांमध्ये गटबाजीला उधाण आले आहे. १३ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटात ही निवडणूक होईल, असे चित्र आहे. काही ठिकाणी शेतकरी कृती समिती निवडणुकीमध्ये सक्रिय होणार आहे.भाजपदेखील निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप काही ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग ,तर काही ठिकाणी राष्ट्रवादी विरोधी गटाला पाठबळ देण्याची शक्यता आहे. 

...यंदा प्रथमच ‘ई-कार्यकर्ता’ प्रचार करणारग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी हायटेक पद्धतीने मतदान होणार आहे. सर्व युवा मतदारांच्या हाती इंटरनेटने जोडलेले मोबाईल आहेत. त्यामुळे युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावर निवडणूक लढविणारे उमेदवार ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. राजकीय पक्षदेखील यामध्ये मागे नाहीत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच ‘ई-कार्यकर्ता’ प्रचार करताना दिसणार आहे.त्यासाठी राजकीय पक्षांनी खास प्रशिक्षक नेमून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले आहे.

सरपंचपदाच्या २६ जागांसाठी ६८ अर्ज इंदापूर : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या पूर्वसंध्येला सरपंचपदाच्या २६ जागांसाठी ६८ तर सदस्य पदाच्या २४६ जागांसाठी १९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,अशी माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी दिली. शुक्रवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. आत्तापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात सरपंचपदासाठी सर्वाधिक अर्ज रेडणी (८) ग्रामपंचायतीसाठी आले आहेत. सदस्य पदासाठी सर्वाधिक प्रत्येकी २० अर्ज मदनवाडी व म्हसोबाची वाडी या दोन ग्रामपंचायतीसाठी आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

राजगुरुनगरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबडराजगुरुनगर : खेड तालुक्यात २३ गावांतील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. अनेकांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले. कुठे भोजनावळी, तर कुठे आमिषे दाखविली जात आहेत. ‘कुठं कुठं जायाचं पंगतीला’, असाच प्रश्न त्यांना मतदारांना पडल्याचे चित्र दिसत आहे. लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे. ३ आॅक्टोबर रोजी सादर अर्जाची छाननी होणार आहे. ५ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचSocial Mediaसोशल मीडियाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी