बिबवेवाडी : एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये चाललेला व्यापारच उत्तम व यशस्वी ठरलेला आहे, असे मत मुंबईच्या जैन स्कूल आॅफ ग्लोबल मॅनेजमेंटचे संचालक परिमल मर्चंट यांनी व्यक्त केले.पुणे जितोच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मर्चंट म्हणाले, ‘‘एकत्र कुंटुबपद्धतीमध्ये जो व्यवसाय असतो त्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यागाची भावना व विश्वास असतो. त्यामुळेच व्यवसाय यशस्वी होतो.’’ युवकांच्या जितो युथ विंगची या वेळी स्थापना करण्यात आली. या विंगच्या मार्गदर्शकपदी अजित सेटिया व संदीप लुणावत यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाला उद्योगपती रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल, राजेश सांकला, विजयकांत कोठारी, विजय भंडारी, संतोष जैन यांच्यासह जितो टीमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
एकत्र कुटुंबातील व्यापारच उत्तम
By admin | Published: April 17, 2015 12:50 AM