तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक २२ रोजी गोंधळ झाल्याने लसीकरणाला आलेल्या नागरिकांचे हाल झाले याबाबत ‘लोकमत’मध्ये (दि.२३) तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गोंधळ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयाने लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांना नंबरचे कुपन दिले जात असल्याने नागरिक रांगेमध्ये येऊन लसीकरण करून घेत आहेत त्यामुळे दोन दिवसांत कुठल्याही प्रकारचा गोंधळ दिसला नाही.
आरोग्य विभाग ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने लसीकरणाच्या दरम्यान गोंधळ टाळण्यासाठी लसीकरणाला जसे नागरिक येतील त्या प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचा शिक्का, दिनांक, नंबर असा उल्लेख असलेले टोकन दिले जात आहे. त्यामुळे नागरिक रांगेत थांबूनच लसीकरण करून घेत आहेत, असे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले.
२६ तळेगाव ढमढेरे
कोरोना लस घेण्यासाठी लागलेली रांग