लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फळे व भाजीपाला विभागातील अनेक आडत्यांनी गेली अनेक वर्षे तोलाईचा भरणा माथाडी मंडळाकडे केलेला नाही. तसेच माथाडी मंडळाकडे आडत्यांनी तोलाईची नोंद केलेली नाही़ याबाबत वारंवार मंडळाकडे व बाजार समितीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र हा विषय गांभीर्याने घेतला जात नसल्याचा आरोप
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने केला आहे.
पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ आणि बाजार समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्केटयार्डातील फळे भाजीपाला विभागातील गट क्रमांक १ ते ७ मध्ये तोलाईचे काम तोलणार करतात या गटातील आडत्यांनी तोलाईच्या केलेल्या भरण्यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास येत आहे़. ही माथाडी कायद्याने श्रमाची चोरी आहे. तसेच हा फौजदारी गुन्हा होवू
शकतो यापूर्वी बाजार समितीने तोलाई, मापाई लेव्ही येणे रक्कम तपशीलाचे पावती पुस्तक तयार केले होते. परंतु, अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे फळे भाजीपाला विभागातील आडते शेतकरी पट्टीतून तोलाई व लेव्ही रक्कम कपात करुन घेतली जात होती. परंतू वर्षानुवर्षे आडते त्याचा स्वत: वापर करीत आहे. माथाडी मंडळाकडे भरणा होत नाही ही गंभीर बाब असल्याचा
आरोपही महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट यांनी केला आहे.