पुणे : जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व त्यांच्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमवून व संगनमत करून जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश असतानाही चाळकवाडी येथील टोलनाक्यावर येऊन बेकायदेशीर टोलवसुली बंद केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या टोलबाधित शेतकºयांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तसेच महामार्गाची अपूर्ण असलेली कामे या कारणावरून जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी व बेकायदेशीर जमाव जमवून व संगनमत करून जमावबंदीचा आदेश असतानाही शनिवारी (दि. १३) दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या समर्थकांसमवेत चाळकवाडी टोलनाक्यावर जाऊन सुरू असलेली टोलवसुली बेकायदेशीरपणे बंद केली असल्याची फिर्याद चाळकवाडी टोलनाक्याचे प्रोजेक्ट मॅनेजर अमित जगदीश राणा यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली, या फिर्यादीवरून पोलिसांनी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्यासह सुमारे एकशे पन्नास ते एकशे साठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश उगले अधिक तपास करीत आहेत.
टोलनाका आंदोलनप्रकरणी आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 1:44 AM