शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

टोलवसुली करता; मग रस्ते दुरुस्ती कधी?

By admin | Published: March 21, 2017 5:01 AM

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ या रस्त्यावर नुकताच मिनीबस व मालवाहू ट्रक यांचा उरुळी कांचनजवळ भीषण अपघात होऊन त्यात ११ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर या दुरवस्थेची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. जेथे अपघात झाला त्याठिकाणी सातत्याने अपघात होऊन अनेकांना मरणयातना भोगाव्या लागतात. पण त्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा असा फलक व धोक्याची सूचना देणारा रेड लाईट सिग्नल बसविणे गरजेचे असताना कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्यतत्परता दाखवत नाही हीच खरी शोकांतिका आहे. संबंधितांनी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नूतन जिल्हा परिषद सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी केली आहे. आणखी किती लोकांचे बळी या कंपनीला व शासनाच्या अधिकाऱ्यांना अपेक्षित आहेत, असा सवाल या भागातील जनता विचारू लागली आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट (ता. हवेली) ते कासुर्डी फाटा (ता. दौंड) या भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी खचलेल्या साईडपट्ट्या अपघाताला कारणीभूत ठरून अनेकांना आपले प्राण गमाविण्याची वेळ आली. तरीही त्याकडे महामार्ग व्यवस्थापन व आयआरबी ही रस्ता बांधणी करणारी खाजगी कंपनी संगनमताने दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप मावळते जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे यांनी केला आहे.महामार्ग व सेवामार्ग यांच्यामधील सुरक्षा म्हणून उभारण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या बऱ्याच ठिकाणी नाहीशा झाल्या आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर बसविण्यात आलेल्या प्रकाशनियंत्रकांचे वेगवेगळ्या अपघातांमध्ये झालेल्या तुटफुटीची दुरुस्ती न करण्याने रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाशझोताने वाहनचालकांना त्रास होतो. पुणे-सोलापूर महामार्गाची टोलवसुली पट्ट्यात कमालीची दुरवस्था झाली असून, टोलवसुली कंपनीचे दुर्लक्षच यामुळेच अशी अवस्था या रस्त्याची झाली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.