शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

टोमॅटोचे बाजारभाव कोसळले! दोन रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:49 PM

नारायणगाव : मेथी, कोथिंबीरला बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच टोमॅटोचे बाजारभाव मंगळवारी (दि. २८) कोसळले. आवक कमी असतानाही मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेटला ५० ते १५0 रु. असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो २ रु. ५0 पैसे बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री केली ...

नारायणगाव : मेथी, कोथिंबीरला बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच टोमॅटोचे बाजारभाव मंगळवारी (दि. २८) कोसळले. आवक कमी असतानाही मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटो क्रेटला ५० ते १५0 रु. असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोला प्रतिकिलो २ रु. ५0 पैसे बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात टोमॅटोची विक्री केली तर काहींनी टोमॅटो फेकून दिली. टोमॅटो हंगाम सुरू झाल्यापासून पाच महिन्यांच्या कालावधीत निच्चांकी असा दर टोमॅटोला मिळाला आहे.

नारायणगावचे टोमॅटो मार्केट राज्यातील अग्रगण्य मार्केट म्हणून ओळखले जाते. टोमॅटो खरेदीसाठी परराज्यातून १०० ते १५० व्यापारी येतात. जून २0१८ पासून टोमॅटोचा हंगाम सुरू झाला, परंतु जून पासूनच सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाला नाही. जून व जुलै मध्ये चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला ३५0 ते ४00 रुपये प्रति क्रेट असा बाजारभाव मिळाला. त्यानंतर बाजारभाव घसरत गेला.गेल्या वर्षी टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने अनेक शेतकरी मालामाल झाले. मात्र यावर्षी फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटो उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. नारायणगावचे टोमॅटो मार्केटमध्ये आज (दि.२८) रोजी १७ हजार ८७५ टोमॅटो क्रेटची आवक झाली.२0 किलोच्या क्रेटला ५0 रुपये पासून १५0 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला. एप्रिलनंतर सर्वाधिक कमी दर आज मिळाला आहे.

मेथी, कोथंबीर, शेपू या भाजीपाल्यांचे बाजारभाव देखील स्थिर आहेत. कोथंबीर ५२ हजार ६00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. मेथी ९६ हजार ३00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३00 ते १00१ असा बाजारभाव मिळाला. शेपू २५ हजार ९00 जुडीची आवक झाली. त्यास शेकडा ३0१ ते ५0१ असा बाजारभाव मिळाला. भाजीपाल्यांची एकूण १ लाख ७४ हजार ८00 जुड्यांची आवक नारायणगाव उपबाजार केंद्रात झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजय काळे व संचालक अ‍ॅड. निवृत्ती काळे यांनी दिली.३ लाख ४९ हजार १५0 क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट ४0 ते १00 रुपये बाजारभाव मिळाला८ लाख १ हजार ८१0 क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट ५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.११ लाख२१ हजार ६३५ क्रेटची आवकझाली. प्रति क्रेट १५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.१३ लाख ७९ हजार ६00 क्रेटची आवकझाली. प्रति क्रेट २00 ते ४00 रुपये बाजारभाव मिळाला.७ लाख ४३ हजार ६६५ क्रेटची आवक झाली. प्रति क्रेट १५0 ते २५0 रुपये बाजारभाव मिळाला.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी