वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे, यंदा दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता ऑनलाइन पद्धतीने झुमॲपद्वारे संस्थेच्या गुरुवर्य जावडेकर सभागृहात संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन, तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सभेमध्ये २०२० - २०२१ या आर्थिक वर्षातील तेरीज, ताळेबंद नफा - तोटा पत्रके स्वीकारणे तसेच या वर्षातील नफ्याचे वाटप करणे, शिक्षक कल्याण निधी व मुदत ठेवींची मर्यादा वाढ असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.
सध्या कोविड या महामारीच्या पार्श्वभूमीवर सभा ऑनलाइन होणार असल्यामुळे, संस्थेच्या सभासदांनी आपले प्रश्न १ सप्टेंबरपर्यंत संस्थेच्या इंदापूर तालुका शिक्षकांची सहकारी पतसंस्था मेलवर, किंवा व्हाॅट्सॲपवर पाठवावेत, असे आवाहन संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण व सचिव संजय लोहार यांनी केले आहे.