पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी साखर कारखान्यांसाठी जाहीर केलेल्या २१ पुरस्कारांत महाराष्ट्राने १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशाला चार तर गुजरात, तमिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली आहेत. पंजाब, हरयाणा व मध्य प्रदेशाला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाले आहे. पारितोषिक वितरण सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे.
महासंघातर्फे दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते व त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, जास्तीजास्त ऊसगाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे पारितोषिके जाहीर करण्यात येतात. केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०२२-२३ साठीची २१ पारितोषिके महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केली. या वेळी महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३८, उत्तर प्रदेश ११, गुजरात ११, तमिळनाडू १०, पंजाब ८, हरयाणा ८, कर्नाटक ४ आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड प्रत्येकी एका कारखान्याने अशा एकूण ९२ कारखान्यांनी सहभाग घेतला. यात देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता.
उत्कृष्ट ऊस उत्पादकता :
प्रथम : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकार कारखाना लि. पो, कुंडल, ता. पलूस, जि. सांगलीद्वितीय : लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर. ता. माजलगाव, जि. बीड
तांत्रिक कार्यक्षमता :प्रथम : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि, पो. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
द्वितीय : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नरविक्रमी ऊस गाळप :
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., गंगामाईनगर-पिंपळनेर, ता. माढा,जि सोलापूरविक्रमी ऊस उतारा :
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदम नगर, पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगलीअत्युत्कृष्ट साखर कारखाना
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. कागल जि. कोल्हापूरविक्रमी साखर निर्यात
प्रथम - जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
द्वितीय - सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड, जि. सातारा