पुणे : पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. त्याचप्रमाणे मराठी, हिंदीतील अनेक दिग्गज कलावंतही पुण्याने आपल्याला दिलेले आहेत. फर्ग्युसन कॉलेजपासून ते इकडे असणारी विविध नाट्यसंस्था यांनी अनेक कलाकार घडवली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला तर पुण्यातून अनेक नायिका मिळाल्या. कालांतराने त्या करिअरसाठी मुंबईत स्थायिकही झाल्या. मात्र त्यांना आजही पुणेकर म्हणवून घ्यायला फार आवडतं.
रोहिणी हंट्टगडी
फिल्म फेअर अॅवॉर्ड, नॅशनल अॅवॉर्ड मिळवलेल्या रोहिणी हट्टंगडी या मुळच्या दिल्लीच्या असल्या तरी अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलमधून झाली आहे. ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकांमुळे लहान पडद्यावरच्या रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले.
राधिका आपटे
सध्या बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत जिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले ती राधिका आपटेही मुळची पुण्याची. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने शिक्षण पूर्ण केलंय.
सोनाली कुलकर्णी
दोघी, देऊळ, दिल चाहता है, सिंघम अशा मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत कारकिर्दी गाजवणाऱ्या सोनाली कुलकर्णीचा जन्मही पुण्यातलाच. पुण्यातल्या अभिनव विद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असून फर्ग्यूसन महाविद्यालयातून त्या पदविकाधर झाल्या.
मृणाल कुलकर्णी
सोनपरी म्हणून ओळख निर्माण करणारी मृणाल कुलकर्णी ही सुद्धा पुण्याचीच. पुणे विद्यापीठातून त्यांनी भाषिक विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. अनेक जाहीराती आणि चित्रपट आणि मालिकांमधून ती कायम आपल्याला भेटत असते.
मुग्धा गोडसे
सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणारी सामान्य कुटुंबात जन्मलेली मुग्धा गोडसे ही अभिनेत्रीही पुण्यातील. पुण्यातल्या मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधून तिने बी.कॉम पूर्ण केलंय. मॉडलिंगपासून सुरू केलेला तिने करिअरच्या प्रवासात अनेक चित्रपटात कामंही केले आहे.
अमृता खानविलकर
आपल्या नृत्याच्या अदाकारीने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारी अमृता ही सुद्धा मुळची पुण्याची. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीने हिने चांगलाच जम बसवलाय. नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर ती अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि छोट्या पडद्यावर दिसून आलीये.
श्रुती मराठे
सध्या गाजत असलेल्या जागो मोहन प्यारेमधील श्रुती मराठे हीसुद्धा पुण्याची आहे. हिंदी, मराठी, तमिळ अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये तिने कामं केलेली आहेत. टेलिव्हिजनवरही तिने आपला प्रेक्षकवर्ग तयार केलाय. ती एका ढोल-ताशा पथकातील सक्रिय वादक आहे.
मुक्ता बर्वे
आपल्या साध्या-सरळ अभिनयाने मराठी प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी मुक्ता बर्वे चिचंवडची आहे. सर परशुराम महाविद्यालयातून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पुढील शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात तिने प्रवेश केला. त्यानंतर तिने मुंबईत आपल्या करियरसाठी कायमस्वरूपी स्थायिक झाली.
तेजस्विनी पंडीत
खलनायिका म्हणून करिअरला सुरुवात करणारी तेजस्विनी पंडितही पुण्याचीच आहे. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटासाठी तिला अनेक नामांकने आणि पुरस्कार मिळाले आहेत. छोट्या पडद्यावरही तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवलीय.