लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जमीन परताव्यासाठी लागणा-या कागदपत्रांच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेताना मावळ प्रांत कार्यालयातील अव्वल कारकुनाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-्यांनी गुरुवारी रंगेहाथ पकडले. प्रविण किसन ढमाले (वय ४०, पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव असून, त्याला सहकार्य करणा-या संदीप जयसिंग घाडगे (वय ३८, आंबेगाव बुद्रुक) यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी विनायक शिवाजी काळभोर (रा. आकुर्डी) यांनी तक्रार दाखल केली आहे. काळभोर व त्यांचे मामा गणेश काटे यांनी मावळ येथे 13 एकर ६ गुंठे जागा विकत घेतली होती. त्यातील ४२ गुंठे जागा ही एम. आय.डी.सी संपादनासाठी प्रस्तावित झाल्याने त्याचा मोबदला म्हणून १ कोटी ६६ लाख ४३ हजार इतकी रक्कम व १५ टक्के जमीन परतावा मिळणार होती. यासाठी ते मावळ प्रांत कार्यालयात गेले असता ढमाले यांनी ‘साहेबांचे काहीतरी करावे लागेल’ असे सांगत एकूण रकमेच्या १२ टक्के इतक्या रकमेची मागणी केली.
अव्वल कारकुनाला लाचप्रकरणी अटक
By admin | Published: June 17, 2017 3:35 AM