पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ७९ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नियमानुसार अर्ज केला आहे. त्यातील ७६.३८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तसेच एकूण प्रवेश क्षमतेच्या ४६.२ टक्के जागा रिक्त आहेत.
प्रवेशाच्या पहिल्या फेरीत २४ हजार २७५ विद्यार्थ्यांनी, दुसऱ्या फेरीतून ७ हजार ५११, तिसऱ्या फेरीतून ३ हजार ४६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर पहिल्या विशेष फेरीतून (चौथी फेरी) २० हजार ७४० विद्यार्थ्यांना कॉलेज ॲलॉट करण्यात आले होते. त्यातील १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
--------------
कॉलेज होणार प्रत्यक्ष सुरू
राज्य शासनाने ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यातच एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण क्षमतेच्या ७० टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल तर संबंधित महाविद्यालयाने शैक्षणिक कामकाज सुरू करावे, असे निर्देश राज्याच्या माध्यमिक उच्च शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू होतील.
-----------
पहिल्या विशेष फेरीतून झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आकडेवारी
शाखा दिलेले प्रवेश प्रत्यक्ष घेतलेले प्रवेश
कला १,९३२ १,५७८
वाणिज्य ८,०९९ ६,५४०
विज्ञान १०,१३७ ८,३६५
एचएसव्हीसी ५७३ ५०३
-------------------------