पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 07:58 PM2021-06-19T19:58:57+5:302021-06-19T19:59:09+5:30

अजित पवार म्हणाले, जिल्ह्याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार करा

Tourism development plan of the district; But everyone has an independent agenda | पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

पर्यटन विकास आराखडा जिल्ह्याचा; पण सर्वांचा स्वतंत्र अजेंडा 

Next

पुणेपुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एक, पीएमआरडीएच्या वतीने दुसराच तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी तिसराच एवढेच नाही तर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी त्यांना अपेक्षित आराखडा सादर करत प्रत्येकानेे आपल्यानुसार विकास आराखडा तयार केला. प्रत्येकांचे वेगवेगळे आराखडे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सुनिल शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे, त्याचे नियोजन करा. पर्यटन स्थळांवर मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घ्या असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आणि ॲड.वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु होणारा हा प्रकल्प स्तुत्य असून त्याबाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. परंतु काम लोकांच्या सुविधेत भर पाडणारे व दर्जेदार काम असावे.

पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग  व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत. 
 -----
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नाही 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला, यासाठी काही आमदारांना पण निमंत्रण दिले. पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांना मात्र या बैठकी संदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पनाच देण्यात आली नाही. कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर लगेच जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्या संदर्भात बैठक घेण्यात आली. पण अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने हाॅलमधून बाहेर पडावे लागले.

Web Title: Tourism development plan of the district; But everyone has an independent agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.