शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पर्यटकांची पुणे दर्शन बससेवेला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 2:50 PM

पुण्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे दर्शन बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बसच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे.

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक महत्व असलेली ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांनी पुणे दर्शन बससेवेला पसंती दिली आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये या बसला फुल्ल होत आहेत. त्यामुळे या बसच्या उत्पन्नात दुपटीने भर पडली आहे. 

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)मार्फत मागील काही वर्षांपासून पर्यटकांसाठी ‘पुणे दर्शन’ ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत शहर व परिसरातील जवळपास २० ठिकाणांचे दर्शन घडविले जाते. त्यासाठी केवळ ५०० रुपये तिकीट असून दोन वातानुकूलित बस उपलब्ध आहेत. त्यासाठी पुणे स्टेशन व डेक्कन जिमखाना येथील बसस्थानकाप्रमाणेच आॅनलाईन बुकींगही करता येते. ही सेवा वर्षभर सुरू असली तरी प्रामुख्याने सुट्टीच्या दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी असल्याने या बसला दररोज गर्दी होत आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यापासूनच पर्यटकांनी पुणे दर्शनला पसंती दिली आहे. मात्र, मे महिन्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसते.

मे महिन्यात १ हजार ७०० पर्यटकांनी या बसमधून प्रवास करीत पुण्यातील प्रसिध्द ठिकाणांना भेट दिली. दररोज प्रतिबस २७ पर्यटकांनी बुकिंग केले होते. या माध्यमातून पीएमपीला तब्बल ८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात हे प्रमाण निम्मे होते. जानेवारीमध्ये ७४७ पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेतला होता. एप्रिल महिन्यात त्यामध्ये काहीशी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. जून महिन्यामध्ये पावसाळा तसेच शाळा सुरू होणार असल्याने पर्यटकांची संख्या निम्म्याने रोडावते. सुट्टीच्या दिवशीही हे प्रमाण काहीसे वाढते. पुणे दर्शनची ठिकाणे 

शनिवारवाडा, सारसबाग, राजा दिनकर केळकर संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय, लाल महल, शिंदे छत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, आगा खान पॅलेस,दगडूशेठ गणपती मंदीर, केसरीवाडा, महात्मा फुले वाडा, चतु:श्रृंगी माता मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, जोशी रेल्वे संग्रहालय, पु. ल. देशपांडे उद्यान, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, युध्द स्मारक, आदीवासी वस्तु संग्रहालय, महालक्ष्मी मंदीर.

पुणे दर्शन बसचे उत्पन्नमहिना    प्रवासी    उत्पन्नजानेवारी    ७४७    ३ लाख ७३ हजार ५००फेब्रुवारी    ६६२    ३ लाख ३१ हजार मार्च    ८२८    ४ लाख १४ हजारएप्रिल १०९३    ५ लाख ४६ हजार ५००मे    १६९९    ८ लाख ४९ हजार ५००

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेtourismपर्यटन