पुणे: पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या आणि प्रत्येक पावसाळ्यात तरूणाईच्या गर्दीमुळे सजणा-या ताम्हिणी घाटापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणारी जमीन देण्यास वन विभागाकडून खो घातला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पौड ते ताम्हिणी घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम करणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो ''
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:28 IST
निसर्ग संपदेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमींची वर्षभर ताम्हिणी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते...
पर्यटकांच्या नेहमीच पसंतीस उतरणा-या ताम्हिणी घाट रस्त्याला वन विभागाचा '' खो ''
ठळक मुद्देपौड ते ताम्हिणी घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम करणे शक्य होत नसल्याची माहिती समोर वन जमिनीची खासगी मालकी असणा-या व्यक्तींना संबंधित जमिनीचा मोबदला द्यावा लागणार परिसरात वैविध्यपूर्ण फुले,पक्षी आणि वन्यजीव आढळतात काही वन अधिका-यांच्या चूकीच्या कार्यपध्दतीमुळे भूसंपादनाच्या कामात अडथळे