पुणे: किल्ले सिंहगडावर रविवारी (दि.१८) पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. गडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉइंट परिसरात काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्यात अनेक तरूण-तरूणी जखमी झाले आहेत. रविवारची सुटी असल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी पहायला मिळत होती. त्यातील कोणी तरी मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहचवली असेल, त्यामुळे त्या मधमाशांनी हल्ला केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गडावर मधमाशांचा हल्ला होण्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे इथे त्याविषयी काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. दर रविवारी हजारो पर्यटक गडावर येतात. त्यामुळे इथे अशा आपत्कालीन घटना घडतात. त्याविषयी आपत्कालीन टीम सज्ज ठेवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. एखादी रूग्णवाहिका येथे ठेवण्याची देखील आवश्यकता आहे.
मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला, तेव्हा काही मुली आरडाओरडा करत होता. त्यांच्या शरीरावर माशांनी चावा घेतलेला होता. त्यामुळे त्यांना आग होत हाेती. ओरडण्याशिवाय त्या काहीच करू शकत नव्हत्या. त्यांचा आवाज ऐकून इतर पर्यटक देखील गोंधळून गेले होते. काही हॉटेलचालकांनी धूर करून मधमाशांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फाेल ठरला. कारण मधमाशा दूर होत्या.