बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 07:54 PM2021-05-28T19:54:46+5:302021-05-28T19:56:31+5:30
बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास नगरपरिषदेची मंजुरी
बारामती : बारामती शहराला आता २४ तास पाणीपुरवठा मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.शुक्रवारी(दि २८)बारामती नगरपालिकेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीच्या बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासह शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणाऱ्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांच्या उभारणीनंतर शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. सन २०५३ पर्यंत बारामतीची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेनुसार ही योजना आखण्यात आली आहे. जवळपास १५५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च होणार आहे. हा प्रकल्पा कार्यान्वित झाल्यानंतर बारामतीकरांना आठवड्याचे सात दिवस चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे. यात ७५ टक्के रक्कम राज्य शासन अनुदानाच्या रुपाने देणार आहे,तर २५ टक्के रक्कम नगरपालिकेला भरायची आहे. शहराच्या दृ ष्टीने महत्वपुर्ण असणाºया प्रकल्पाला आज अखेर मंजुरी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.
विषय क्रमांक १८ वरील चचेर्नंतर विषय क्रमांक १९ ते विषय क्रमांक २९ पर्यंतचे विषय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चर्चेविनाच एकमुखी मंजूर करण्यात आले. त्यानंतरच्या विषयांवर कोणतीच चर्चा झाली नाही. नटराज नाट्य कला मंडळास जागा देण्याच्या विषयाला विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी विरोध दर्शविला.
यावेळी पार पडलेल्या सभेत तांदुळवाडी हद्दीतील रेल्वे भुयारी मार्गालगतचे रस्ते करणे,इंदापूर चौकात शॉपिंग सेंटर बांधकामाच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, वसंतराव पवार नाट्यगृह व कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, सर्व्हे क्रमांक २२० मधील कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, जळोची, तांदुळवाडी, रुई व बारामती ग्रामीण व मुळ हद्दीतील रस्त्याची कामे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.