शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के, मर्सिडीजला ६ टक्के जीएसटी, ही तर शेतकर्‍यांची चेष्टा : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:22 PM

बारामती दौर्‍यावर असताना खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका केली. 

ठळक मुद्देराज्य सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक : राजू शेट्टीशेट्टी यांची केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका

बारामती : जीएसटीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के तर मर्सिडीज कारला ६ टक्के जीएसटी ही शेतकर्‍यांची चेष्टा नाही का? असा परखड सवाल करीत ही तर शेतकर्‍यांना बरबाद करणारी नीती आहे, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.बारामती दौर्‍यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी यांनी केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका केली. शेट्टी म्हणाले, राज्य सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक आहे. शेतकर्‍यांची केवळ चेष्टा झाली आहे. त्यांच्या हातात काही पडलेले नाही. सरकार शेतकर्‍यांना मदत करतेय म्हणजे उपकार करत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शासन मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा करीत आहे. ४ हजार ५०० ज्या सोयाबीनला भाव मिळाला ते सोयाबीन ३ हजार रुपये हमीभाव असताना २४०० रुपयांनी विकण्याची वेळ आली. प्रत्येक पिकाच्याबाबत असेच झालं. त्याला राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केल्यामुळे सोयाबीन, सूर्यफुल, भुईमूगचे दर पडले. डाळ मोठ्या प्रमाणात आयात झाल्याने तूर, उडीद, मुगाचे भाव देखील पडले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून सरकारने शेतकर्‍यांचे कर्ज संपवावे. त्याला पुन्हा आयुष्य सुरु करण्याची संधी द्यावी. दिलेल्या आश्वासनानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा. अन्यथा खोटारडेपणाची कोणती शिक्षा द्यायची ते शेतकरी ठरवतील, असा टोला शेवटी त्यांनी लगावला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, महेंद्र तावरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उसाला चांगला दर मिळाला पाहिजेयावेळी नैसर्गिक परिस्थीती चांगली आहे. शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे. या हंगामात किती उत्पादन होणार, साखरेची जागतिक परिस्थती काय असणार याचा अंदाज बांधणार आहे. दराबाबत शेतकर्‍यांची मते तसेच कारखानदारांशी चर्चा करून उस दराच्या मागणीबात निर्णय घेतला जाईल. सगळ्या शेतकर्‍यांची संमती घेण्यात येईल, असे  खासदार शेट्टी यांनी सांगितले.

...ते तर आधीपेक्षाही वाईट निघालेआधीच्या सरकारचा अनुभव वाईट आल्याने मोठ्या आशेने नवीन लोकांबरोबर संगत केली. ते तर आधीपेक्षा वाईट निघाले. सगळेच राजकीय पक्ष सारखेच आहेत. प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकर्‍यांचा दबावगट आवश्यक आहे. या दबावगटावर मतपेटी हलली पाहिजे. त्यावेळी कोणताही पक्ष शेतकर्‍यावर अन्याय करण्याची हिंमत करणार नाही, असे खासदार शेट्टी म्हणाले.

दिल्लीमध्ये १८० शेतकरी संघटना एकत्र येणारशेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत दि २० नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येवून मोठे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी १० लाख शेतकरी एकत्र येणार आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये यासाठी स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव मिळावा, ही आमची मागणी आहे. दिल्लीमध्ये होणार्‍या या आंदोलनासाठी आत्तापर्यंत १४ राज्यांचा दौरा आपण केला आहे. ऊस परिषदेनंतर उर्वरित राज्यांचा दौरा लवकरच केला जाणार आहे, असे खासदार राजु शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGSTजीएसटी