पुणे - कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स नवी दिल्ली यांनी किरकोळ व्यापार अस्थिर व उध्वस्त करू शकणाऱ्या वॉलमार्ट फ्लिपकार्ड करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोधासाठी शुक्रवार (दि. २८) रोजी भारत बंदचे आवाहन कॅट पुणे प्रमुख दिलीप कुंभोजकर यांनी पत्रकार परिषदेत केले.कुंभोजकर म्हणाले, विदेशी कंपन्यांना मुबलक आर्थिक बळ मिळत आहे. त्यांना केवळ २ ते ३ टक्के व्याजदरवर व्यवसायाकरिता निधी उपलब्ध होत असतो. तसेच जगभरातील कोणत्याही भागातून ते स्वस्त दरात माल खरेदी करू शकतात. परंतु भारतात किरकोळ व्यापार क्षेत्रास १० ते २० टक्के व्याजाने निधी उपलब्ध होत असतो.पुण्यातील जितो, दि पुना मर्चंटस चेंबर, आॅल केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट महासंघ, व्यापारी महासंघ, हमाल पंचायत यांनी सदर बंदला पाठींबा दिला आहे व इतरही संस्था आपला पाठींबा दर्शविण्याकरिता येते आले आहेत
व्यापारी संघटनांचा शुक्रवारी भारत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 3:22 AM