यावेळी सिद्धेश्वर बगाडे, अशोक दुगड, प्रवीण चोरडीया, प्रकाश बाफणा, तुषार वेताळ, राहुल ओस्तवाल, मितेश गादिया, कुणाल बोरा, फिरोज सय्यद, देवल शाह, प्रीतेश कोठारी, अमित कोठारी, लोकेश चोपडा, कांतिलाल शर्मा, राजेंद्र कर्नावट, कपिल बोरा,खालिद शेख, विकास सुराणा, ज्ञानराज मालेगावकर यासह मोठ्या प्रमाणात व्यापारी उपस्थित होते.
शासनाने लागू केलेल्या निमयांमुळे छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहे. त्यांच्या आर्थिक चक्र विस्कटले गेले आहे. या निर्णयामुळे व्यापारी व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे . शासनाचे नियमांचे पालन करुन शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद ठेवणार असून इतर दिवशी
सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकान उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही या निवेदनात दिला गेला आहे.
०७ शिरुर
शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देताना व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते.