पुणे : पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठाच्या स्किल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिमबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, कुलगुरू श्रवण करवेकर उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, "देशाची ६० टक्के लोकसंख्या ही तरुण आहे. या लोकसंख्येला कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केल्यास आपण जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करू शकू. कौशल्य विकास हाच आर्थिक आणि सामाजिक विकासाचा रस्ता आहे. उद्योग आणि शिक्षण व्यवस्था यांनी एकत्रित येऊन प्रशिक्षित मनुष्यबळास रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. "देशासाठी प्रत्येकाने सीमेवरच जाऊन लढण्याची गरज नाही. माहिती तंत्रज्ञान, हार्डवेअर, बांधकाम अशा विविध क्षेत्रात आघाडी घेऊन देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावत येऊ शकेल असे फडणवीस यांनी सांगितले.यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, स्वाती मुजुमदार यांनी विचार मांडले. श्रवण करवेकर यांनी आभार व्यक्त केले.
पारंपरिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यात अपयशी : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 4:24 PM
पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठळक मुद्देसिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठाच्या स्किल सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटनरोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत चांगला : फडणवीस