शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पवनानगर परिसरात वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:04 IST

३० डिसेंबर मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

पवनानगर - पवनानगर परिसरात ३१ डिसेंबर आणि नववर्षारंभासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ३० डिसेंबर मध्यरात्रीपासून ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल (Traffic Diversion) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.पुणे-मुंबई-कामशेत बाजूकडून पवनानगर बाजारपेठेकडे येणारी हलकी चार चाकी वाहने बंद करुन ती येळसे ग्रामपंचयात फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे-मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे- वारु फाट्यावरुन पुढे सरळ, ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हेंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वळविण्यात आली आहे. परंतु पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, घामनधरा, दुधिवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.येळसे ग्रामपंचायत फाटा पेधून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजूकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे, मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थनिक रहिवाशी यांना येळसे बाजूकडे येण्यास बंदी (Traffic Diversion) करण्यात येत असून वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे वेळसे कामशेत या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहेत.३० डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी या कालावधीत पवनानगर बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जड-अवजड वाहतूक ही पवनानगर बाजारपेठ येथे जाण्यास बंदी करण्यात येत आहे. त्याऐवजी जुने विश्रामगृह पवानानगर मार्गे केदारी खानावळ चौकातून सरळ पुढे सात नंबर कॉलनी-पत्राचाळ सचिवालय ग्रामपंचायत इमारत अशी बाह्यवळणमार्गे वळविण्यात येत आहे. पंरतु, ब्राम्हनोली, कालेगाव, दुधीवरे बाजूकडून येणारी जड -अवजड वाहतूक पवनानगर बाजारातून येळसे बाजूस सोडण्यात येतील.१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री बारा पासून ते मध्यरात्री बारा पर्यंत या कालावधीत तुंग, गोरवे, चावसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकूरसाई, फांगणे बाजुकडून पवनानगर, कामशेत बाजुकडे जाणारी वाहने ही काले कॉलनी पवनानगर बाजूकडे जाणेस बंदी आहे. त्याऐवजी ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन (Traffic Diversion) डावीकडे कोथुर्णेगाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटामार्गे मुंबई, पुणे, कामशेतकडे वळविण्यात येतील, पंरतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधिवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड-अवजड वाहने यांना सोडण्यात येईल.१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते मध्यरात्रीपर्यंत या कालावधीत ब्राम्हणोली फाटा उजवीकडे वारु फाटा सरळ-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजूकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच वारु व ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाशी यांना पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठ असे येण्यास बंदी करण्यात येत असून वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे- कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस