कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात लागू आहे. मात्र, असे असतानाही वाहने मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. या वाहनांची कोणीही तपासणी करत नसल्याने वेगात महामार्गावरून वाहने जाताना दिसतात.
महामार्गावर नारायणगाव तसेच राजगुरुनगर या दोन्ही शहरांच्या बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या दरम्यान वाहतूक पोलीस कुठेही काम करताना दिसले नाही. महामार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्यानंतर काही बेशिस्त वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने घेऊन येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नव्हते. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर शहरातील पिंपळगाव फाटा,बाजार समिती समोर तसेच मुळेवाडी रस्ता, साळी हॉस्पिटल समोर या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होत असते. मात्र, याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो.
मंचर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर दुपारी वाहतूककोंडी झाली होती.