रावेत : बिजलीनगर ते वाल्हेकरवाडी या स्पाइन रोडवर नियमित दुतर्फा वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. चिंचवड वाहतूक विभागास नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनसुद्धा वाहतूक विभाग या वाहनावर कोणत्याही प्रकारची करवाई करीत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक विभागाबाबत उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठी वाहने दररोज बिनधास्तपणे उभी केली जातात. त्यामुळे नेहमी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गावरून परिसरात असणाऱ्या अनेक विद्यालय आणि महाविद्यालयात हजारो विद्यार्थी पायी सायकलवरून ये-जा करीत असतात. दोन्ही बाजूंनी मोठी वाहने उभी असल्यामुळे मुलांना इतर वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकवेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात होऊन विद्यार्थी जखमी झाले आहेत. दररोज या मार्गावर नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारत असतात. या वाहनाच्या आड दडून दागिने हिसकावण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. सदर वाहनचालकास नागरिकांनी वाहने उभी करण्यास मनाई केल्यास चालक दमदाटी करतात. अशा वेळी वाहतूक विभागाचे कर्मचारी मात्र बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे नागरिक-वाहतूक कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक होते. (वार्ताहर)
अनधिकृ त पार्किगमुळे वाहतुकीस अडथळा
By admin | Published: October 16, 2015 12:49 AM