यादरम्यान वाहतूक पोलीस मात्र कुठे पहावयास मिळाले नाही. पावसातून व वाहतूक कोंडीतून व भरपावसात वाहने चालवताना वाहनचालकांना अडचण येत होती. बोपोडी चौकापासून खडकी रेल्वे स्थानकपर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे बोपोडी चौक ते खडकी पोलीस स्थानक संविधान चौकापर्यंत दोन-तीन महिन्यांपासून रस्ता बंद करण्यात आलेला असून, पुणे-मुंबई मार्गावरून बोपोडीकडून डावीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून वाहतूक वळवण्यात आल्यामुळे या रस्त्यावर मोठा ताण पडत आहे.
याठिकाणी जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले पाहिजे; मात्र तसे होताना दिसत नाही. पोलीस उपस्थित नसल्यामुळे बोपोडी ते खडकी मार्ग शुक्रवारी संध्याकाळी काहीकाळ उशिरापर्यंत जाम होता. याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली.