मोकट जनावरांचा घोळका रस्त्यावर ठिकठिकाणी उभा असतो किंवा ही जनावरे एकत्रित येऊन रस्त्यावर बसलेली असतात. विशेषत: ही दृष्य गोपाळवाडी रोड, पाटील चौक, रेल्वे कुरकुंभ मोरी, हिंद टॉकीज, गोकुळ सर्कल या परिसरात दिसून येतात. परिणामी वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावरच ही जनावरे एकत्रित येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालक हॉर्न वाजवून बेजार होतात. मात्र ही जनावरे काही हालत नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी होते.
त्यातच ही जनावरे जागीच घाण करतात त्यामुळे भर रस्त्यावर घाण साचून दुर्गंधी पसरते वास्तविक पाहता ही जनावरे मोकाट नसून कोणीतरी पाळलेली जनावरे आहेत. खाण्यापिण्यासाठी ही जनावरे सकाळी सोडली जातात रात्री ही जनावरे परत घरी जातात. तेव्हा ही जनावरे कोणाची आहेत. याचा शोध घेवून जनावरं मालकांवर गुन्हे दाखल करा या मागणीने जोर धरला आहे.
मोकाट जनावरांच्या बाबतीत नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषदेकडे कोंढवाडा नावाची वास्तु नाही . तेव्हा मोकाट जनावरांसाठी कोंढवाडा करावा आणि त्यातच ही जनावरे डांबली जावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
कोट........
दौंड शहरातील मोकाट जनावरांचा वाढत उपद्रव लक्षात घेता जनावरे पकडण्यासाठी तसेच जनावरे ज्या व्यक्तीच्या मालकीची आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. शहरातील कोंढवाड्या संदर्भात चौकशी केली जाईल.
- निर्मला राशिनकर
मुख्याधिकारी
फोटो ओळ : दौड येथील गोकुळ सर्कलजवळ रस्त्यावर अस्तव्यस्त असलेले मोकाट जनावरे की ज्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. (छाया : मनोहर बोडखे)
0२१२२0२0-दौंड-१९
-----------------------