पुणे - सोलापूर महामार्गावर दुपारनंतर परिसरांतील शेतकरी आपला शेतमाल विक्री करण्यासाठी येेेथे येतात. स्थानिक व्यापारी तो खरेदी करून तेथेच विक्री करण्यासाठी बसतात. परिसरांतील स्थानिक नागरिक व महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी ताजा व स्वस्त भाजीपाला खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची कोंडी होते. परिणामी वाहणांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी यांचे हाल होत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. अशी परिस्थिती असताना या बाजारामध्ये बहुतांश खरेदीदार व विक्रेते विनामास्क फिरत असतात. तसेच होत असलेल्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे.
सदर बाजार महामार्गावरच भरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच विक्रेते उर्वरीत व सडका शेतमाल रस्त्यावर फेकत असल्याने यापरिसरात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधी मुळे लोकाच्या आरोग्यला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या महामार्गावरून कंटेेेनर, टॅकर, ट्रक, एसटी, बस, लक्झरी आदी अवजड व मोठी वाहणे भरधाव वेगानेे सोलापूर बााजूकडे जात असतात. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर अपघात होवून मोठ्या प्रमाणात जिवीतहाणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी येथून काही अंतरावर उभे असतात. सर्व दिसत असूनही ते याकडे दुर्लक्ष का करतात ? हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
परिसरांतील स्थानिक नागरिक व महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी ताजा व स्वस्त माल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.