पुणे : लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला होता. परंतु, वरपक्षाची वरात मंडपात आली नव्हती. त्यामुळे वधूपक्षाकडील मंडळी चांगलीच वैतागली होती. कारण वरपक्षाची वरात वाहतूककोंडीत अडकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा या परिसरात येत असल्याने सर्वत्र रस्ते बंद केले होते. परिणामी कोंडीचा फटका नवरदेवाच्या वरातीला बसला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांची भेट घेण्यासाठी रुबी हॉस्पिटलला आले होते. सुरक्षा आणि प्रोटोकॉलनुसार अनेक गाड्यांचा ताफा त्यांच्यासमवेत होता. मोदी रुबी हॉस्पिटलला जाईपर्यंत आणि तेथून निघेपर्यंत त्या भागातील वाहतुकीची कोंडी झाली. मात्र या सगळ्याचा फटका एका नवरोबाला सहन करावा लागला. या नवमुलाची मिरवणूक नेमकी याच रस्त्याने अल्पबचत भवनच्या दिशेने निघाली होती. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा, आजुबाजुला असलेली वाहतूककोंडीच्या गराड्यात नवरा आणि मिरवणूक अडकून पडली. दुसरीकडे लग्नमंडपात सर्वजण नवºया मुलाची वाट पाहून मंडळी कंटाळून गेली होती. मोदींचा वाहनाचा ताफा रुबीच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियोजन क रताना दिसत होते. मोदी रुबी हॉस्पिटलपर्यंत पोहचेपर्यंत मालधक्का चौक, आरटीओ चौक, मंगलदास रस्ता येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान अल्पबचत भवन येथे असणाऱ्या एका नवऱ्यामुलाची मिरवणूक सुरू होती. परंतु मोदींच्या गाडयांचा ताफा हॉस्पिटलजवळ आल्याने आसपासचे सर्वच मार्ग बंद होते. अशावेळी मिरवणूक त्या वाहतूककोंडीतून मार्ग काढत लग्नस्थळी जाण्याचा प्रयत्न करत होती. मोठ्या आनंद व उत्साहात मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळींची मात्र या वाहतूककोंडीमुळे नाराजी झाली. त्यांना सातत्याने वाहनचालकांच्या रागाला सामोरे जावे लागत होते. साधारण तासाभराने या भागातील वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत लग्नस्थळी मिरवणुकीची वाट पाहणारी मंडळी कंटाळून गेल्याचे दृश्य दिसून आले.
मोदीजींचा वाहनताफा लवकर जाईना अन् नवरा मंडपात येईना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 1:36 PM
वऱ्हाडी मंडळी कंटाळली
ठळक मुद्देरुबी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्या भागात प्रचंड वाहतूककोंडी