शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

 औंध येथे साकारला जातोय ‘ट्रॅफिक पार्क’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 1:09 PM

पुणे शहरातील वाहतूक समस्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी

ठळक मुद्देलहान मुलांना वाहतूक साक्षर करण्यासाठी पथदर्शी उपक्रम

पुणे : शहरातील वाहतूक समस्या वाढ ही नित्याची बाब झाली आहे. तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील नागरिक वाहतूक साक्षर असावे, यासाठी औंध येथील ब्रेमेन चौक येथे लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा साकारला जात आहे. या ट्रॅफिक प्लाझाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे शहरातील वाहतूक समस्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी झाली आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे ट्रॅफिक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन शहरात होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अनेकदा वाहतूक नियम न पाळल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे या समस्येत अजूनच भर पडत आहे. लहान मुलांना आपल्या लहान वयातच एखादी गोष्ट शिकविली तर मुले त्या सवयीचा आयुष्यभर उपयोग करतात. या हेतूने मुलांना लहान वयातच वाहतुकीचे नियम कळावेत तसेच लहान वयापासूनच त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची सवय लागावी या हेतूने औंध येथील राजभवन रस्त्यावरील ब्रेमन चौक येथे अडीच एकर जागेमध्ये महानगरपालिकेच्या विभागामार्फत लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा विकसित करण्याचे काम चालू आहे. महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी रस्ता सुरक्षा आणि रहदारीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी युरोपीय देशांचा दौरा केला. त्यावेळेस डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथील ट्रॅफिक पार्क ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी पाहिले त्यावेळेस पुण्यातदेखील एखाद्या ट्रॅफिक पार्क असावे, असा त्यांचा मानस होता. त्यानंतर औंध येथील ब्रेमन चौक येथे ट्रॅफिक पार्क साकारण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेतर्फे  घेण्यात आला. ट्रॅफिक पार्कमध्ये लहान लहान रस्ते असतील. त्या रस्त्यांमध्ये रहदारीची संकेत आणि चिन्हे बनविली जातील. मिनी सिग्नल, चिन्हांकित रस्ता, झेब्रा क्रॉसिंग, पदपथ, दुचाकी पार्किंग, गॅस स्टेशन, बसथांबे, रहदारी दिवे, लहान मुलांच्या सादरीकरणासाठी मिनी अँम्फीथिएटर, सँडपिट आणि लहान मुलांसाठी व्यायामाची उपकरणे तसेच मुलांबरोबर येणाºया पालक व शिक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची देखील या ठिकाणी सोय करण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी या प्रकल्पांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या जागा ताब्यात घेता वेळेस स्थानिकांच्या विरोधाचा सामना अधिकाºयांना करावा लागला व हा प्रकल्प बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. .......प्रकल्प सुरू करताना स्थानिक नागरिकांनी जागा देण्यास विरोध केला. परंतु त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या अडचणी सोडवून नंतरच जागेचे हस्तांतरण करण्यात आले. लहान मुलांना लहान वयामध्ये वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी या हेतूने हा प्रकल्प साकारण्यात येत असून या प्रकल्पासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी छोट्या सायकलींचीदेखीलसोय करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. लहान मुलांना आकर्षित करतील, असे ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, पादचारी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत.अर्चना मधुकर मुसळे, स्थानिक नगरसेविका...........ट्रॅफिक पोलिस अधिकाºयांनी देखील या संकल्पनेचे कौतुक केले असून ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी त्यांनी येरवडा परिसरातील दोन एकर जागेत देखील अशा प्रकारचे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क बनवावे, अशी आॅफर दिली आहे, असे पथ विभागाचे अधिकारी दिनकर गोजरे यांनी सांगितले. 

टॅग्स :AundhऔंधTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक