पुणे - वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सुमारे १ कोटी रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक शाखेकडून दंडआकारणी केली जात असून, गेल्या वर्षभरात अशा ६ लाख ७३ हजार ९९२ जणांवर सीसीटीव्ही आणि डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.या वाहनचालकांना एसएमएस पाठविला व दंड भरण्यास सांगण्यात आले होते़ तरीही अनेकांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वाहतूक शाखेकडे दंडआकारणी करूनही प्रत्यक्षात दंडवसुली होत नसल्याचे दिसून येत होते़ त्यामुळे ज्या वाहनचालकांनी हा दंड भरलेला नाही अशा वाहनाचालकांची नाकाबंदीत तपासणी करून त्यांच्याकडून दंडवसुली केली जात आहे़अशी केली जाते दंडवसुलीवाहतूक शाखेच्या वतीने दररोज २ तास शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते़ वाहतूक पोलिसांना एक मोबाईल अॅप देण्यात आले आहे़ त्यावर वाहनाचा नंबर टाकल्यावर त्या वाहनावर काही कारवाई केली असेल, तर त्याची माहिती येते़ त्यात चलन नंबर, कधी, कोठे व केव्हा नियमभंग केला, कोणता नियम तोडला आणि त्याला किती दंड आहे, याची माहिती येते़ त्याबरोबर फोटोही येतो़ याशिवाय या दंडाची रक्कम भरली आहे की नाही, याचीही माहिती त्यासोबत मिळते़ तसेच, अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकापेक्षा अधिक वेळा नियमभंग केला असेल तर त्याचीही माहिती त्यावर दिसते़ त्यानुसार पोलीस वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत़ वाहतूक पोलिसांच्या वेबसाईटवरही हे अॅप असून त्यावर आपल्या वाहनाचा नंबर टाकल्यास कारवाई केली आहे की नाही, त्याची माहिती मिळते.गेल्या ६ फेबु्रवारीपासून वाहतूक पोलिसांनी ही मोहीम सुरू केली असून ४ मार्चअखेरपर्यंत तब्बल ३० हजार १८४ वाहनचालकांकडून ९५ लाख २८ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे़ नव्या वर्षात ई-चलानाद्वारे दंडआकारणी केलेल्या ५३ हजारांहून अधिक वाहनचालकांकडून दंडवसुली करण्यात आली असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे़- अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा़
वाहतूक पोलिसांकडून महिन्यात कोटीची वसुली, ३० हजारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:12 AM